कल्याण पूर्वेतील महायुती उमेदवार सुलभा गायकवाड यांचा रॅलीच्या माध्यमातून प्रचाराचा प्रारंभ

Nov 06, 2024 - by Ghar junction

91 views

कल्याण पूर्वेतील महायुती उमेदवार सुलभा गायकवाड यांचा रॅलीच्या माध्यमातून प्रचाराचा प्रारंभ

कल्याण पूर्वेतील महायुती उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या प्रचाराचा जोशात प्रारंभ

तिसाई देवीच्या चरणी माथा टेकून प्रचारफेरीची सुरुवात

कल्याण, ६ नोव्हेंबर:
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्व मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुलभा गणपत गायकवाड यांनी तिसाई देवी आणि गावदेवी मातेच्या आशीर्वादाने आपल्या प्रचाराची जोशात सुरुवात केली. या प्रचारफेरीत सुलभा गायकवाड यांच्या समर्थकांचा उत्साह दिसून आला, ज्यामध्ये शेकडो महिला आणि कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.

या शक्तीप्रदर्शनातून गायकवाड यांचे तळागाळात केलेले कार्य, प्रगतीशील विकासकामे आणि जनतेसाठीची त्यांची निःस्वार्थ सेवा मतदारांना आवाहन करत असल्याचे दिसून आले. या प्रचाराच्या निमित्ताने भाजप पक्षाकडून लोकांचा पाठिंबा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जगन्नाथ पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष नरेंद्र (नाना) सूर्यवंशी, महिला मोर्चाच्या रेखा राजन चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्जुन नायर, सुभाष म्हस्के, माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड आणि इतर मान्यवर, तसेच स्थानिक ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Recent comments(0)

Leave a comment


 8055000190

Thank You
Ok
Alert
Ok
Enquire Now
Please fill out below details