MahaRERA Registered Channel Partner · A041332503743 · maharera.maharashtra.gov.in
Home/News/टिटवाळ्यातील महागणपतीचे दर्शन घेत महायुती उमे...

टिटवाळ्यातील महागणपतीचे दर्शन घेत महायुती उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या प्रचाराचा शुभारंभ; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Gj Ghar junction
6 Nov 2024 · 1 min read · 307 views
टिटवाळ्यातील महागणपतीचे दर्शन घेत महायुती उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या प्रचाराचा शुभारंभ; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जनता पुन्हा विधानसभेत आपल्यालाच पाठवणार, विश्वास विश्वनाथ भोईर यांचा

कल्याण, दि.5 नोव्हेंबर – कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांनी आपल्या निवडणूक प्रचाराला आजपासून सुरुवात केली आहे. टिटवाळा येथील श्री महागणपतीचे दर्शन घेऊन त्यांनी या प्रचाराला शुभारंभ केला. गेल्या अडीच वर्षांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या विकासकामांच्या बळावर मतदार पुन्हा एकदा आपल्यालाच विधानसभेत पाठवतील असा विश्वास विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केला.

कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कल्याण पश्चिममध्ये महायुतीच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या जल्लोषात पार पडले. या उद्घाटनानंतर लगेचच विश्वनाथ भोईर यांनी आपल्या प्रचाराला टिटवाळ्यातील श्री महागणपती मंदिरात दर्शन घेऊन प्रारंभ केला.

यावेळी वाजत-गाजत भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, रिपाई महायुतीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. या रॅलीला टिटवाळा परिसरातील जनतेनेही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, प्रत्येक गल्लीत भोईर यांचे स्वागत झाले.

“विकासकामांच्या आधारावर जनतेचा विश्वास” - विश्वनाथ भोईर

कोविडनंतरच्या अडीच वर्षांच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या विकासासाठी अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले आहेत. कल्याण पश्चिम मतदारसंघात दोन हजार कोटी रुपयांची विकासकामे सध्या अंतिम टप्प्यात आहेत, अशी माहिती भोईर यांनी दिली. या भक्कम कामगिरीच्या आधारे जनता पुन्हा एकदा आपल्याला विधानसभेत पाठवणार, असा ठाम विश्वास त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

रॅलीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, विधानसभा संघटक मयूर पाटील, माजी नगरसेवक जयवंत भोईर, संतोष (आप्पा) तरे, तसेच महिला संघटक नेत्रा उगले आणि इतर अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Enquire Now

Comments (0)

More news

Disclaimer: Ghar Junction Consultancy Services Private Limited is an independent real estate advisory and authorised channel partner (MahaRERA: A041332503743). We are not the developer of the projects listed on this website.

All trademarks, logos and project branding belong to their respective developer owners and are used here strictly for identification and marketing purposes as an authorised channel partner.

WhatsApp Call now