One Signature for Student Safety Harsh Foundation Kalyan

Oct 05, 2025 - by Welcome To Kalyan

54 views

One Signature for Student Safety Harsh Foundation Kalyan

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जनजागृती आणि ठोस उपाययोजना राबविण्याच्या मागणीसाठी हर्ष फाउंडेशन तर्फे आयोजित “एक सही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी” या स्वाक्षरी अभियानाला कल्याण पूर्वेतील नागरिक आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.

कल्याण पुना लिंक रोडवरील सेंट जुडस शाळेसमोर हे अभियान घेण्यात आले. परिसरातील विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आल्यामुळे नागरिकांनी या सामाजिक उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.


फाउंडेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने पुढील शालेय सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे —


  • पुना लिंक रोडवर रस्ता दुभाजक (Divider) बसविणे

  • झेब्रा क्रॉसिंग आणि सिग्नल यंत्रणा उभारणे

  • शाळा सुटणे/भरताना ट्रॅफिक हवालदारांची नेमणूक

  • अवजड वाहनांची वाहतूक केवळ रात्री ८ ते पहाटे ६ या वेळेतच ठेवणे

  • “पुढे शाळा आहे, सावकाश चला” असे सूचना फलक बसविणे

हर्ष फाउंडेशनचे संस्थापक हर्षल शिंदे, अध्यक्षा उर्मिला चौधरी, सचिव अश्विनी बंदीचौडे, सभासद कीर्ती नारखेडे, प्रमिला बढे, पल्लवी शिंदे आणि आदित्य व्यापारी यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

अभियान सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत पार पडले आणि केवळ पाच तासांत शेकडो नागरिक आणि पालकांनी आपली सही नोंदवून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस भूमिका घेतली. परिसरातील विविध शाळांनीही या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला.

हर्ष फाउंडेशनतर्फे वाहतूक पोलीस, केडीएमसी प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींशी सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याचे सांगण्यात आले. 

Recent comments(0)

Leave a comment


 8055000190

Thank You
Ok
Alert
Ok
Enquire Now
Please fill out below details

 By checking this box, you agree to our Privacy Policy and consent to be contacted with relevant updates.