Dec 11, 2024 - by Ghar junction
109 views
कल्याणमधील अनुबंध संस्था वंचित आणि आदिवासी वस्तीतील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. अभ्यास आणि संस्कार वर्गाच्या माध्यमातून या मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करत त्यांना उज्ज्वल भविष्याची वाट दाखवण्याचे कार्य संस्थेमार्फत करण्यात येत आहे.
संस्थेने आपली नवीन शाखा कल्याण-पडघा मार्गावरील बापगाव येथे सुरू केली आहे. या ठिकाणी आदिवासी मुलांना हसत-खेळत शिक्षण मिळावे, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. या कार्यात कल्पिता कदम, नयन जाधव, निहारा जाधव, विशाल जाधव, सूर्यकांत कोळी, प्रभाकर घुले, दशरथ साबळे, मिलिंद कदम, विशाल कुंटे, वैभव देशमुख यांसारखे कार्यकर्ते महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
या संस्थेच्या प्रयत्नांमुळे अनेक वंचित मुलांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली असून, शिक्षणाचा प्रकाश प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचे ध्येय अनुबंध संस्था जोमाने पूर्ण करत आहे.
Recent comments(0)